नागोठणे लायन्स क्लब तर्फे विविध प्रकारचे शालेय साहित्य व खाऊचे वाटप
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
गेल्या अनेक वर्षांपासून नागोठणे शहर व ग्रामीण विभागात आपल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यातून ठसा उमटविणा-या नागोठणे लायन्स क्लबची धुरा सामाजिक कार्यकर्ते ला. पांडुरंग शिंदे यांनी स्वीकारल्यापासून नागोठणे लायन्सच्या क्लबच्या समाजकार्याची घौडदौड आणखी जोरात सुरु झाली आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे विभागातील राजिपच्याआनेक प्राथमिक शाळा तसेच अनेक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना नागोठणे लायन्स क्लब तर्फे विविध प्रकारचे शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. एम.जे. एफ लायन यशवंत चित्रे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या सौजन्याने व सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.
नागोठणे लायन्स क्लब कडून गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या लावेचीवाडी, पिंपळवाडी आणि वासगाव येथील विद्यार्थ्यांना वह्या व खावुचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी एम जे एफ लायन यशवंत चित्रे काका, लायन दिपक गायकवाड तसेच विनोद सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात एम.जे .एफ लायन यशवंत चित्रे व पांडुरंग शिंदे यांचे हस्ते यावेळी वहया व खाऊचे वाटप करण्यात आले . यावेळी मनोगत व्यक्त करताना लायन दिपक गायकवाड यांनी मुलांना मोलाच मार्गदर्शन केले. तसेच लायन यशवंत चित्रे यांनी मुलांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन पांडुरंग शिंदे, लायन यशवंत चित्रे, लायन दिपक गायकवाड, लायन विनोद सावंत, केंद्र प्रमुख सौ. नयना मुदगुल, शिक्षिका मालती टेंभे, मुख्याध्यापक प्रज्योत खांडेकर, शिक्षक चंद्रशेखर खाडे, शिक्षक अरुण म्हात्रे, राजिपच्या माजी सदस्या सखुबाई पिंगळा व विद्यार्थ्यी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment