Press "Enter" to skip to content

“सौ.ममता म्हात्रे यांचे यशस्वी आयोजन”

पनवेल मध्ये रंगली मंगळागौर स्पर्धा

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित सखी मंगळागौर ग्रुप यांच्या नियोजनाखाली मंगळागौर स्पर्धेचे रायगड आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दीडशेपेक्षा जास्त महिलांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.

यावेळी माणगाव, अलिबाग, श्रीवर्धन पासून विविध मंगळागौर स्पर्धक आले होते. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रंजना जनार्दन म्हात्रे, सौ.सुनीता दिलीप पाटील, सौ.प्रज्ञा बारटक्के, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, सर्व मा.नगरसेविका सौ. पुष्पलता मढवी, डॉ.सौ सुरेखा मोहकर, सौ प्रीती जॉर्ज,सौ सारिका भगत, सौ.प्रजोती म्हात्रे ,शेकाप महिला आघाडी सरस्वती काथारा उपस्थित होत्या.
    

इरशालवाडी दुर्घटनेला  एक महिना पूर्ण झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तेथील मृत्यू पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीने मंगळागौर खेळून आलेल्या सर्व स्पर्धकांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अखेरीस परीक्षक सौ.मुग्धा लेले यांनी सहभागी झालेल्या संघामधून  विजेता संघ निवडणे अत्यंत कठीण आहे. सहभाग घेतलेल्या सर्वच महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्वतः गाणे गाऊन संस्कृती जपत मंगळागौर खेळल्या. अशाप्रकारे स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील शहरीकरणाचा मोठा भाग असलेल्या पनवेल तालुक्यामध्ये या स्पर्धा भरवल्या गेल्या आणि यामध्ये रायगड मधील ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा संधी दिली गेली अशा प्रकारचे शहरी आणि ग्रामीण भागातील एकत्रितरीत्या नियोजनबद्ध स्पर्धा आयोजित केल्यामुळे आज आम्हाला सुद्धा पनवेल सारख्या ठिकाणी आमची संस्कृती कलेच्या माध्यमातून सादर करता आली असे मत ग्रामीण भागातील स्पर्धकांनी व्यक्त केले.
    

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित सखी मंगळागौर ग्रुप यांच्या नियोजनाखाली मंगळागौर स्पर्धेचे रायगड आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात प्रथम क्रमांक नील ग्रुप खांदा कॉलनी, द्वितिय क्रमांक स्नेह ग्रुप दिवेआगर, तृतिय क्रमांक मनस्विनी अलिबाग यांनी पटकावला. तसेच अनेक उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा दिली गेली. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांच्या आयोजनाखाली सखी मंगळागौर ग्रुप पनवेल यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे मंगळागौर स्पर्धा यशस्वीरित्या महाराष्ट्राची संस्कृती जपत पार पडल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.