बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा हडपण्याचा डाव : पेण मुद्रांक विक्रेता हबीब खोत यास पोलिसांकडून अटक
सिटी बेल ∆ विषेश प्रतिनिधी ∆
पेण शहरातील असणाऱ्या कस्तुरी प्लाझा या इमारतीमधील निवासी सदनिका आणि व्यापारी गाळ्याचे बनावट मृत्युपत्र तयार करून त्या मृत्युपत्रामध्ये बेकायदेरित्या तीन नावे वाढवून तेथील सदनिका आणि व्यापारी गाळा हडप करण्यासाठी डाव रचल्या प्रकरणी पेण येथील मुद्रांक विक्रेता हबीब खोत याला पेण पोलिसांनी नुकतीच अटक केली.
या बाबत सविस्तर वृत्त असे, पेण येथील फिर्यादी पुनम शंभुनाथ गुप्ता यांच्या आईच्या मालकीहक्कात असलेल्या निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा याचे मृत्युपूर्वी मृत्युपत्र बनविले होते मात्र पूनम यांची आई प्रभावती शंभुनाथ गुप्ता यांच्या मृत्यु पश्चात प्रभावती यांची विभक्त सून आणि या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गीता सुशील गुप्ता रा. टिटवाळा- कल्याण हिने अंधेरी येथील वकील जनार्दन रावजी मोरे आणि पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या मदतीने दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी बनावट मृत्युपत्र बनवून गीता गुप्ता हिने तिचे व तिच्या दोन मुलींची नावे बनावट मृत्युपत्रात वाढविली यातील फिर्यादी पूनम गुप्ता ही शारीरीक दृष्ट्या 85 टक्के दिव्यांग आहे पूनम यांच्या आईच्या मृत्युपश्चात उपरोक्त मिळकतीवर पूनम व तीचा भाऊ अनिलकुमार गुप्ता यांचे नाव लावण्यासाठी त्यांनी नगरपरिषद येथे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी रितसर अर्ज केला असता तेव्हा या बनावट मृत्यूपत्राचे प्रकरण उजेडात आल्याचे फिर्यादी पूनम गुप्ता यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी गीता गुप्ता यांना या प्रकरणांमध्ये अटक सुद्धा करण्यात आली होती व सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे पोलिसांनी गीता गुप्ता यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांनी या कामी मदत केल्याचे चौकशीत तीने उघड केल्याने गीता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौकशीअंती हबीब खोतला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याबाबत पेण पोलिस ठाण्यात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहिते करत आहेत.हबिब खोत यास न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.








Be First to Comment