सिटी बेल ∆ वहाळ साई देवस्थान ∆
श्री साई देवस्थान साईनगर वहाळ यांच्यावतीने कोरोना काळात वहाळ ग्रामपंचायतीच्या ॲम्बुलन्सवरील चालक सचिन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील उपस्थित होते.
सचिन गायकवाड यांनी कोरोना काळात फार चांगलं काम केलं. फक्त ड्रायव्हरचं न काम करता कबीर घरत यांच्याबरोबर राहुन त्यांनी स्मशानभूमीत फाट्या रचनाचे सुद्धा काम केले. कुणाच्या बरोबर कोण नसेल तर त्याला आधार देण्याचे काम केले.
स्मशानभूमीतील राख थंड होईपर्यंत थांबून नातेवाईकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. वहाळ, बामनडोंगरी, मोरावे, जावळे सहित पूर्ण उलवे नोड मधील लोकांचे मृतदेह हॉस्पिटल मधून आणून दहन करण्याचे काम केले. त्याचबरोबर आजपर्यंत जेवढे एक्सीडेंट झाले असतील त्यांना स्वतःच्या हाताने उचलून दवाखान्यापर्यंत नेऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम देखील ते करीत असतात. अशा या सेवाभावी व्यक्ती ला साई देवस्थान वहाळ ने सन्मानित केलं.








Be First to Comment