महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पोलादपूर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बबन शेलार यांची निवड
सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ प्रतिनिधी ∆
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पोलादपूर तालुका पत्रकार संघाची बैठक रायगड जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली.
पोलादपूर शहरातील लोकसेवा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पोलादपूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्षपदी कोकण तक युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक आमीर तारलेकर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी प्रिती बुटाला तर सहसचिव पदी ऋताली पवार तर खजिनदार पदी योगेश भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून विश्वास नलावडे व श्रीकांत भिलारे हे कार्यरत राहणार आहेत.
यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे नेते वसंत मुंडे डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र केल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटीत करण्यासाठी मे महिन्या अखेरपर्यंत व्यापक प्रयत्न सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले.
नवनिर्वाचित पोलादपूर तालुका अध्यक्ष बबन शेलार यांनी पोलादपूर तालुक्यातील पत्रकारांना तसेच नवोदितांना सोबत घेऊन पत्रकारितेची प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी आपण अनुभवाचा पुरेपूर वापर करून तालुक्यात नावलौकिक निर्माण करण्याची ग्वाही दिली.








Be First to Comment