अलिबाग आणि मुरूड तालुक्याला जोडणारा साळाव रेवदंडा पुल वाहतुकीसाठी बंद
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
रायगड जिल्हयातील अलिबाग आणि मुरूड तालुक्याला जोडणारा कुंडलिका खाडीवरील महत्वाचा असणारा साळाव रेवदंडा पूल हा दुरूस्तीच्या कारणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रेवदंडा साळाव पूल अवजड वाहतुकीसाठी रायगड जिल्हा अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणांस्तव बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आज दिनांक 30 मार्च रोजी साळाव पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन तास पूल हा पूर्णतः बंद केल्याने वाहनचालक यांच्यासाहित प्रवाशी वर्ग त्रस्त झाले होते.
साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ साली करण्यात आले असून या पुलाची लांबी ५१० मीटर एवढी आहॆ. ह्य पुलाला बारा गाळे आहेत . ह्या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए. आर . अंतुले यांच्या काळात झाला आहे . त्यामुळे रोहा,मुरुड, आणि अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत . सालाव रेवदंडा खाडी पुलामुळे मुरुड तालुक्याचा आर्थिक विकास ,सामाजिक,औद्योगिक झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुलाखालून जाणाऱ्या कोळशाच्या जाणाऱ्या बार्जेसने दोन वेळा पुलाचा खांबाला ठोकर मारल्याने पुलाचे खांब कमकुवत झाले आहेत तसेच याअनेक वेळा या पुलावरून जेएसडब्लू कंपनीचे तसेच इतर अनेक अवजड वाहने या पुलावरून ये जा करीत असल्याने पूल हा कमकुवत झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम हाती घेऊन फक्त मेक ओव्हर करण्याचे काम केले.
या परिसरातील नागरिकांनी तसेच वाहन चालक यांनी साळाव रेवदंडा पूल कमकुवत झाल्याने नव्याने पूल बांधण्याची मागणी केली होती.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा साळाव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार पुलाच स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग करण्याचे निर्देश वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयूट मुंबई बांदारे देण्यात आले होते. त्यानुसार माहे नोव्हेंबर मध्ये सदर कामाची निविदा ही संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिग प्रा. लि. यांना देण्यात आली असून, त्यांनी कामास सुरुवात केली आहे.








Be First to Comment