Press "Enter" to skip to content

प्रवाशांची होतेय गैरसोय

अलिबाग मुरूडला जोडणारा कुंडलिका खाडी पूलावरून एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतुक बंद

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या कुंडलिका खाडी पूलावरून एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतुक बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसहित प्रवाशी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा साळाव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार पुलाच स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग करण्याचे निर्देश वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयूट मुंबई बांदारे देण्यात आले होते. त्यानुसार माहे नोव्हेंबर मध्ये सदर कामाची निविदा ही संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिग प्रा. लि. यांना देण्यात आली असून, कामाची सुरुवात करण्यात आली आहे.

रेवदंडा साळाव पुलावरील होणारी अवजड वाहतूक २१ जून ते ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत १२ टनावरील अवजड वाहतूक बंद करुन, अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे होत असलेली आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन, सदर वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरुन वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गाने करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून, Lifting activity for Bearing replacement & Pedestal Casting करीता उपविभागीय अधिकारी, सा.बां. उपविभाग क्र. १ आणि प्रकल्प प्रमुख, रेवदंडा पूल यांच्याव्दारे सदर पूलावरील ४ महिन्याकरीता अवजड वाहतूक (५ टनावरील) बंद करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने जड वाहतुकीमुळे पूलाला होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्याकरता व दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याकरीता ५ टनावरील सर्व वाहनांची वाहतूक ४ महिन्यांकरीता पूर्णपणे बंद करुन, सदर पुलावरील अलिबाग साळाव दरम्यान होणारी जड वाहनांची वाहतूक ही अलिबाग- पोयनाड – नागोठणे -कोलाड- रोहा-तळेखार- साळाव मार्गे तसेच वडखळ- अलिबाग साळाव दरम्यान होणारी वाहतूक ही वडखळ- कोलाड- रोहा- तळेखार साळाव या पर्यायी मार्गाने करण्याची अधिसूचना निर्गमित करण्याबाबत या सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग चे अभियंता सुखदेव यांनी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विनंती केली होती.

पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांना दिलेल्या पत्रात दि.०३/०३/२०२३ रोजीच्या पत्रान्वये -अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक हा अलिबाग-पांबनाइ वडखळ नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेक पोस्ट- नागोठण- कोलाङ-रोहा- तळेखार- साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग- बेलकडे वावे-सुडकोली-रोहा- तळेखार साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड- साळाव तळेखार- चणेरा-रोहा- कोलाड-नागोठणे-वडखळ- पोयनाड-अलिबाग अथवा मुरुड-साळाव तळेखार-रोहा- कोलाड- नागोठणे- पेझारी चेकपोस्ट-अलिबाग तसेच दुसरा मार्ग मुरुड- साळाव तळेखार-रोहा- सुडकौली- बावे- बेलकडे अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापरही करु शकतात असे अभिप्राय सादर केलेले आहेत. आणि ज्याअर्थी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरुन होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पुल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच रेवदंडा साळाव पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु करावयाचे असल्याने, रेवदंडा साळाव पुल हा ५ टनावरील वाहतुकीस पुर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याची खात्री झाली असल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

डॉ. योगेश म्हसे, जिल्हादंडाधिकारी रायगड यांनी केलेल्या आदेशात अ.क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून २ महिन्यांकरिता रेवदंडा – साळाव पुल ५ टनावरील वाहतुकीस बंद करणेबाबतचे आदेश पारित केले आहे.

मुरूड आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस ह्या मुरूड भालगाव रोहा मार्गे मुंबई असा प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागणार आहे तसेच अलिबाग येथे मुरूड नांदगाव बोर्ली येथून एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. मुरूड आगार व्यवस्थापक यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता त्यांनी मुरूड येथून मुंबई पुणेकडे जाणाऱ्या बसेल या साळाव मार्गे रोहा असा सोडण्यात यावे अशी मागणी प्रवाशाकडून करण्यात आली आहे.

अलिबाग आगारातून विद्यार्थी यांच्यासाहित प्रवाशी वर्गाची गैरसोय टाळण्यासाठी दिवसातून दोन तीन गाड्या सुरू करण्यात येतील अशी माहिती अलिबाग आगरप्रमुख अजय वणारसे यांनी दिली आहे.

मुरूड आगारातुन काही बसेस ह्या साळाव मार्गे सोडण्यात येतील तर काही बसेस ह्या भालगाव मार्गे या बसेस सोडण्यात येतील अशी माहीती मुरूड आगरप्रमुख नीता जगताप यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.