गुढीपाडव्याच्या आनंदासाठी सरकारकडून “आनंदाचा शिधा” पण.. शिधाविना साजरा झाला गुढीपाडवा
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
राज्य शासनाने गुढीपाडव्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली. परंतु हा आनंदाचा शिधा अद्याप गोदामातच आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करु शकले नाही.त्यामुळे शिधाविना साजरा झाला गुढीपाडवा साजरा झाला.
दीपावलीनंतर गुढीपाडवाही गोड व्हावा, म्हणून शासनाने शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्यापूर्वी शिधा मिळेल, अशी शिधा पत्रिकाधारकांना आशा होती. परंतु आता गुढीपाडवा होऊन तीन दिवस उलटूनसुद्धा रायगड जिल्ह्यातसहित राज्यात अनेक ठिकाणी पूर्ण किट प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा विनाच गुढीपाडवा साजरा करावा लागला आहे. शहरी व ग्रामीण भागात आनंदाच्या शिधा न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी सूर उमटत आहे. दिवाळीतील आनंदाचा शिधा दिवाळीनंतर मिळाला होता. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुढीपाडव्याचा ‘आनंदाचा शिधा’ अद्याप गोदामातच आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करु शकले नाही.राज्य सरकारने गुढीपाडवा व सणांच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयात आनंदाचा शिधा पोहोचवण्यासाठी जय्यत तयारी केली होती. मात्र आठ दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यामुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न आले. या महिन्याच्या शेवटपर्यंत आनंदाचा शिधा विविध रेशन दुकानात पोहोचण्याची शक्यता आहे. आनंदाचा शिधाविनाच यंदाचा गुढीपाडवा साजरा झाला आहे.
रायगड जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधापैकी फक्त तेल आले तेही मात्र दहा टक्के इतकेच. आनंदाच्या शिधापैकी उर्वरित साहित्य जिल्ह्यात अद्याप ही न आल्याने तेलचे वाटपसुद्धा न करता तशाच अवस्थेत तेल हा शिधा दुकानामध्येच एका कोपऱ्यात पडून आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाही. गुढी पाडव्यासाठी आनंदाचा शिधा हा रेशन दुकानांपर्यंत पोहचला नाही.तो शिधा अक्षय तृतीया पर्यंत पोहेचेल का ? असाही प्रश्न काही शिधा पत्रिका धारकांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यात आनंदाचा शिधामधील सर्व साहित्य पोहोचायला आणखी किती दिवस लागणार आहे.याची माहिती आम्ही देऊ शकत नाही. केवळ तेल आलेले असून इतर साहित्य(जिन्नस) आल्यानंतर आनंदाच्या शिधामधील पूर्ण साहित्य आल्याशिवाय दुकानातून शिधा वाटप करणार नसल्याचे सांगितले.सरकारकडून आधीच शिधा वितरण सुरु करायला हवं होतं, असं मत काही रेशन दुकानदार यांनी व्यक्त केलंय.
आनंदाचा शिधा लवकरात लवकर स्वस्त धान्य दुकानांवर पोहोचावा यासाठी सरकारने आदेश काढले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही.
रायगड जिल्ह्यात आनंदाचा शिधा मधील तेल हे आले असून इतर जिन्नस हे तीन ते चार दिवसात आल्यानंतर त्याचे वाटप आठ दिवसांत ऑन लाईन पद्धतीने सुरू केले जाईल. रायगड जिल्ह्यात 431042 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधाचे संच वितरित करण्यात येईल.सदर शिधा वितरण हे महिना भर चालणार आहे. – गोविंद वाकडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय.
रायगड जिल्ह्यातील
गोदामाचे नाव, संचाची संख्या
अलिबाग 27635
पोयनाड 12523
पेण 40840
मुरुड 16164
पनवेल 72341
उरण 25650
कर्जत 16867
कशेळे 13596
नेरळ 10497
खोपेली 24039
चौक 11372
माणगाव 24116
गोरेगाव 12313
तळा 9641
सुधागड 16843
रोहा 31520
महाड 21976
बिरवाडी 7750
श्रीवर्धन 13987
म्हसळा 11525
पोलादपूर 9847
एकुण 431042

Be First to Comment