सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजास एकीकडे रायगड जिल्हा प्रशासन कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत आदिवासीं विकासाच्या वल्गना करीत असताना त्याच रायगड मधील पेण तालुक्यातील आदिवासीं समाजाकारिता रस्ता,वीज, शुध्द पाणी, शिक्षण, रोजगार यासारख्या मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संघटनांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले की,आदिवासी बांधवांना जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची चौकशी करावी, पेण सहित खालापूर तालुक्यातील तथाकथित आय.एस.ओ. ग्रुप ग्रामपंचायत दूश्मी- खारपाडा हद्दितील वडमालवाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी व रस्ता करून द्यावा, स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापासून वंचित असलेल्या तांबडी, उंबरमाळ, केळीचीवाडी, काजूचीवाडी, खऊसावाडीची स्वतंत्र आदिवासी ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी व त्यांना तात्काळ नागरी सुविधा पुरवण्यात यावे, खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दतील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि टोकाची वाडी या आदिवासी वाड्यांना रस्ता व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याच्या याव्यात.

या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ऍड.सिध्दार्थ इंगळे, सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, सुनील यशवंत वाघमारे, उंबरमाळ संतोष घाटे, खडई ठाकूरवाडी, नर्मदा तुळशीदास वाघे, वडमालवाडी,अनिता संतोष वाघे, वाडमालवाडी,रेश्मा शत्रुघन हिलम वाडमालवाडी, रंजना राजू वाघे, रविता दिलीप वाघे, आशा मंगेश सवार, गुलाबाई परशुराम वाघे,पुष्पा रामा वाघे, गंगू पांडू वाघे, मनीषा रवी वाघे, शारदा संजय वाघे, आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Be First to Comment