सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबाग वावे रस्त्यावर असणाऱ्या गेलं कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका ठेकेदारांच्या साईटवर काम करणारा कर्मचारी याने रस्त्यावर एका २० वर्षीय अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थ हे आक्रमक होत त्यांनी कंपनीवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील एका मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता.या प्रकरणांनंतर स्थानिक ग्रामस्थ यांनी आक्रमक प्रवित्रा घेत त्यांनी क गेलं कंपनी वर मोर्चा काढत कंपनीच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी भैया हटाव,बेटी बचाव नारे दिले.त्याचप्रमाणे भैया (परप्रांतीय)याना कंपनीतून तसेच काही स्थानिक ग्रामस्थांनी भाड्याने राहण्यास खोल्या दिल्या असतील तेथून त्यांना हाकलून देण्यात यावे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आदी मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.

यावेळी कंपनी प्रशासनाने सांगितले की कंपनीच्या आवारात सद्यस्थितीत कुठल्याही ठेकेदारांचे काम सुरू नसून फक्त कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी असून कार्यालयीन काम सुरू असल्याचे सांगितले.
ग्रामस्थांनी त्यांची खात्री पटवून घेण्यासाठी दोन महिलासहित इतर पुरुष यांचे शिष्टमंडळाना पोलीस गाडीमध्ये घेऊन कंपनी मध्ये जाऊन खात्री करून घेण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे आय चे वरीष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर,शिवसेना ठाकरे गटाचे पिंट्या ठाकूर, काँग्रेस आय चे अनंत गोंधळी,जितेंद्र, गोंधळी, आदी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबतची हकीकत अशी की,शुक्रवारी दिनांक 17 मार्च 2023 रोजी रात्री तालुक्यातील चिंचोटी गावच्या रस्त्यावर एका २० वर्षीय अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच तिने आरडाओरडा केला आणि गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु गावकऱ्यांनी त्यातील उपेंद्र कुमारला चांगलाच प्रसाद दिला. मात्र आरोपीचे दोन साथीदार फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत
आहेत. या घटनेची नोंद रेवदंडा पोलिसांनी घेतली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे चिंचोटी आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव प्रचंड संतापला होता. गेल कंपनीच्या ज्या ले कंत्राटी ठेकेदाराकडे परप्रांतीय असलेला आरोपी काम करतो, त्या ठेकेदाराला बोलवा, त्या शिवाय आरोपीला घेऊन जाऊ नये असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. वातावरण चांगलेच तापले होते.
पोलिसांच्या लाठीचार्ज वर गावकरी नाराज गावकरी ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. त्या परप्रांतीय तरुणाच्या ठेकेदार मालकाला बोलवा, ही एकच मागणी होती. या वेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे
गावकऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या लाठीचार्ज मध्ये पीडित मुलीच्या वडिलांना देखील मार बसला. या लाठीचार्ज वर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील,नायब तहसीलदार अजित टोळकर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दयानंद गावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे,मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ यांच्या सहित पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment