मुखवटे,कलर,विविध प्रकारच्या पिचका-या खरेदीसाठी लगबग
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
होळी तसेच धूलिवंदनचा सण काही तासांवर येऊन ठेपला असल्याने बच्चे कंपनीमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, मोहपाडा, खोपोली,चौक अशा विविध बाजरपेठ होलीच्या अगमणासाठी सजल्या असून बाजारपेठत विविध प्रकारच्या पिचकारी,रंग,विविध प्रकारचे मुखवटे अशा विविध वस्तूची ग्राहाकांना भुरळ घातली जात आहे.

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत खेळला जाणारा आबालवृध्दांचा सण आहे. या निमित्ताने आपआपासातील वैर विसरून अनेकजण एकत्रित येऊन हा सण साजरा करण्याची जणू भारतीय परंपरा आहे. त्याचप्रमाणे या सणाला पौराणिक महत्त्व असल्याने हिंदू समाजात हा सण महत्त्वाचा मानला जातो.

सध्या बाजारपेठेत होळीच्या नैवेद्याचे पापड, फेण्या, कुरडया तसेच रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंगाच्या सोबतीला चिनी पिचकार्या बाजारात दाखल झाल्या आहेत. होळी उत्सवाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी असल्याचे सुध्दा दिसून येते. बाजारात महिलावर्ग होलीचे साहित्य खरेदी करण्यांची लगबग सुरु झाली असून,त्याचबरोबर बाजारात पिचकार्या दाखल झाल्या असून बच्चे कंपनीकडून त्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे.सध्याच्या महागाईच्या युगात भारतीय परंपरा जपण्यासाठी दैनंदिन खर्चात बचत करून हा सण साजरा करत असल्याचे सर्वत्र ठीकाणी पहावयास मिळत आहे.

Be First to Comment