Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा पोलिस कार्यालय येथे तोफगाडा लोकार्पण

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतरही ऐतिहासिक शस्त्रांचा सन्मान करणार – सोमनाथ घार्गे

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

रायगड पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात काही ऐतिहासिक तोफा धुळ खात जीर्ण अवस्थेत पडलेले असल्याचे सहयाद्री प्रतिष्ठानच्या निदर्शनास आल्यानंतर या तोफगाडाना सुस्थितीत आणून त्यांना गाडे बसवून जीवंतपणा आणल्याने हेच तोफगाडे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अवरात विराजमान करुन त्याचा लोकार्पण सोहळा पुष्प सुमनांचा वर्षाव करुन करण्यात आला.

पेण सहयाद्री प्रतिष्ठान आयोजित या लोकार्पण सोहळ्याला रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल, कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक महेश पाटील, अलिबाग नागाव सरपंच निखिल मयेकर, सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठानचे सदस्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की सहयाद्री प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अजुनही आमच्या कार्यालयात बरीच ऐतिहासिक शस्त्रे आहेत त्यांचा देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान करून योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर यावेळी समीर म्हात्रे यांनी प्रास्ताविक सादर करताना सहयाद्री प्रतिष्ठानच्या राज्यभरातील कामाचा पाढा वाचून एवढेच नव्हे तर यापुढे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याची जोपासना आणि ऐतिहासिक वारसा अविरातपणे जपत आहोत आपणही सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन या गड किल्ल्यांची जोपासना करूया असे आवाहन केले.आपल्या देशातील शस्त्रास्त्रांचा मान ठेवणे आणि सन्मान करणे हे केवळ जवनांचेच काम नाही तर या देशाचे नागरीक म्हणून सर्वसामान्य व्यक्तींचे देखील कर्तव्य आहे.जो समाज आपला ऐतिहासिक वारसा जपुन त्याच्या मान राखतो त्या समाजाचा सन्मान जग ठेवत असतो असे यावेळी रघुराजीराजे आंग्रे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.