Press "Enter" to skip to content

परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने “परिणीता सखी सन्मान पुरस्कार”

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही परिणीता सखी सन्मान या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल येथील गोखले सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त 08 मार्च रोजी सायंकाळी 4 वा. हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला, महिला उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका अशा एकूण 17 जणींना यावर्षीचा परिणीता सखी सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ स्वागत तोडकर, अभिनेता किरण माने , जे बी एस पी संस्थेच्या डिरेक्टर मेंबर, सीकेटी स्कुलच्या कमिटी मेंबर आणि बीसीटी कॉलेज ऑफ लॉच्या कमिटी मेंबर तसेच पनवेल मधील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या अर्चना ठाकूर, लायन्स क्लब पनवेलच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, ऑक्सिलेरी क्लबच्या लायनलेडी दिपा मोहिनी मुकेश, आंतरराष्ट्रीय किर्तिच्या अॅस्ट्रोलॉजर डॉ.शिबानी कासुल्ला, इंडिया फॅशन आयकॉनच्या रनअरअप सरोज पवार, अभिनेता आणि कोरिओग्राफर अभिषेक शिंदे, संस्कृती कला दर्पणच्या संस्थापिका अध्यक्ष तसेच नामवंत अभिनेत्री अर्चना नेवरेकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडणार आहे.

या गौरव सोहळ्यासाठी पनवेल, रायगड, पेण, उरण या भागातील तसेच अन्य भागातील परिणीता सदस्या आणि महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. परिणीता सोशल फाऊंडेशन दरवर्षी एका नामवंत महिलेला परिणीता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर या पुरस्काराने सन्मानीत करते यावर्षी या पुरस्कारासाठी तोडकर संजीवनी प्रा.लि.च्या सीईओ तसेच महिला स्वास्थ्य फाऊंडेशनच्या संस्थापिका संजीवनी तोडकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच परिणीता सखी सन्मान या पुरस्कारासाठी यावर्षी निवड करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे जाहीर झाली आहेत. यात, अनेक मराठी मालिकांच्या लेखिका अश्विनी स्नेहल रमेश, पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी संस्कृती द वे ऑफ सेलिब्रेशन या इव्हेंट कंपनीच्या सर्वेसर्वा मेघना संजय कदम, सुपसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट डॉ. प्रिती गाडे, शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध प्राध्यापिका योगिनी यल्लपा वैदू, केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीजच्या सर्वेसर्वा वैशाली कंकाळ, नवी मुंबईतील प्रसिद्ध अॅडव्हॉकेट सुलक्षणा जगदाळे, सुप्रसिद्ध शिक्षिका शारदा निवाथे, नॅचरोपॅथीतज्ज्ञ डॉ.नीता निकम आणि मेडिकल अॅस्ट्रोलॉजर कांचन साळगांवकर, गोकुळ कॉपर हाऊसच्या सर्वेसर्वा सुनिता कोलकर, अनुप एंटरप्रायझेसच्या सर्वेसर्वा प्रतिमा येरगोळे, डेलिश टेस्टि फुडच्या सर्वेसर्वा अपर्णा जंगम सुप्रसिद्ध अॅस्ट्रो, न्युमरो आणि वास्तू कन्सलटंट आयेशा देशमुख, सुप्रसिद्ध शेफ आरती निजापकर, पेणच्या नगरसेविका ज्योती म्हात्रे आणि खारघर येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.सोनाली कालगुडे यांचा समावेश आहे.

यावर्षीच्या महिलादिनासाठी परिणीता सोशल फाऊंडेशनच्या सन्माननीय सदस्या आणि विविध उद्योजिकांनी गिफ्टिंग पार्टनर म्हणून कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिले आहे. यात अलंक्रिता फॅशनच्या सर्वेसर्वा कृपाली चौबळ, इंडियन फ्युजनच्या सर्वेसर्वा दिपाली नारकर, आठल्ये मसालाच्या सर्वेसर्वा श्रुती आठल्ये, श्लोक इव्हेंट्स अॅन्ड डेकोरेटर्सच्या सर्वेसर्वा सोनल पवार, स्वादबंधच्या सर्वेसर्वा अमृता जोशी यांचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमासाठी तोडकर संजीवनी प्रा.लि आणि टीआयपीएल पनवेलचे मुख्य सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाला सर्व परिणीता महिला सदस्यांनी तसेच इतर महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या संस्थापिका साक्षी सागवेकर, संस्थापक प्रशांत सागवेकर, परिणीताच्या रायगड जिल्हा प्रमुख स्मिता जोशी, परिणीता एक्झिबिशन विभागाच्या महाराष्ट्र प्रमुख नंदिनी पंडित यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.