डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त
श्री.सदस्यांकडून पेण येथे महास्वच्छता मोहीम
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त पेण येथील प्रतिष्ठान च्या वतीने श्री सदस्यांनी पेण शहरात महास्वछता अभियान राबवला या स्वछता अभियानात शहरातून २५.९८ टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.यात १३०२ श्री सदस्यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ,रेवदंडा यांच्या वतीने त्यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त पेण शहरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये पेण तहसील, वनविभाग, पोलीस स्टेशन, तालुका दिवाणी न्यायालय, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पेण रेल्वे स्टेशन परिसर, पेण स्मशान भूमी, रामवाडी बस स्थानक, रामवाडी एस. टी. विभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय यासह कुंभार आळी, म्हाडा कॉलनी, नंदीमाळ नाका, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते चावडी नाका आदि सर्व शहरातील भागांची स्वच्छता करण्यात आली.

या स्वछता मोहिमेतून ६.४५ टन सुका कचरा व १९.५३ टन ओला कचरा असा एकूण २५.९८ टन कचरा गोळा करुन पेण नगरपालिकेच्या कचरा डेपो येथे नेण्यात आला.

Be First to Comment