Press "Enter" to skip to content

खालापूर तालुक्यातील शिक्षकांची मोहीम

शिक्षकांचे इसाळगड येथे गडसंवर्धन,स्वच्छता समवेत नैसर्गिक जलस्त्रोत केले पुनर्जीवित

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

खालापूर तालुक्यातील शिक्षकांनी नुकताच समुद्र सपाटीपासून ३७०० फुट असलेल्या चौक येथिल इसाळगड येथे जावून स्वच्छता समवेत या ठिकाणी असलेले पाण्यांचे नैसर्गिक जलस्त्रोत्र स्वच्छता करुन पुनर्जीवित केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत झाले.यावेळी तालुक्यातील ६० शिक्षक सहभागी झाले होते.

तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, अ. झि. ठाकूर गुरुजी यांच्या संकल्पनेतून गडावर या गडाचा आभ्यास तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यांच्या उद्देशाने नियोजन करण्यात आले होते.

सभोवताली घनदाट झाडी उंच डोंगर दरी हे सर्व पार करुन सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्न करुन या ठिकाणी सर्व शिक्षक पोहचले.या ठिकाणी या गडाचा अभ्यास पुर्व इतिहास जाणून घेतला.शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित असतांना गड किल्यांची माहिती आवर्जून पुस्तकात असते.यामुळेच प्रत्येक शिक्षकांना या बद्दल सखोल माहिती उपलब्ध व्हावी या उद्दात विचारांतून या गड किल्यांवर जाण्यांचे नियोजन करण्यात आले. मोरबे धरण प्रकल्पग्रस्त समन्वय समिती सदस्य अंकुश वाघ यांनी सर्व शिक्षक वर्गांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी खालापूर तालुका शिक्षक सेना अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक – संदीप पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेश म्हात्रे, जुनी पेन्शन माजी राज्याध्यक्ष राजेंद्र फुलावरे , संतोष निघोट , कैलास मोरे , मुरलीधर पालवे, संजय पाटील ,मस्तान बोरगे,श्रीधर शेंडे, अरुण बडे , सागर रणदिवे, संतोष लवांडे , अशोक गीते,सचिन नवले, बबन दवभट ,भरत पिंपळे, माधव कोकणे खेमणार माधव कोकणे, सचिन बारवकर , प्रदीप बडे ,गणेश नागरे , रामदास थोटे यांनी सहभाग घेतला

त्याच बरोबर बस्वराज स्वामी , अमित मिडगुले, योगेश खोत, ज्ञानेश्वर मरगजे , वैजनाथ जाधव , सुधीर राठोड , अनिल गाडगे अदि उपस्थित होते.चौक आदर्श शाळेचे मुख्याध्यापक उध्दव राठोड यांनी आभार मानले.गड उतरल्यावर चौक ग्रामपंचात सदस्या लक्ष्मी वाघ यांनी गडाची स्वच्छ्ता, नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जीवित केल्याबद्दल सर्वांना थंड पेय देऊन आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.