सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
येथील गोखले एज्युकेशन सोयटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात रविवार दिनांक १९ फेब्रु रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि ना.गोपाळ कृष्ण गोखले स्म्रृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाविदयालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक किशोर लहारे यांचे हस्ते छ. शिवाजी महाराज व ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले, या वेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील काही प्रसंग सांगुन आजच्या काळात छत्रपतींचे कार्य आजही देशाला व राज्याला मार्गदर्शक असल्याचे सांगीतले तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी, मवाळ नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या तिसऱ्या स्म्रृती दिनी १९ फेब्रुवारी १९१८ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्याचे सांगितले.
यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. या कार्यक्रमास प्राचार्य डाॅ.श्रीनिवास जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Be First to Comment