सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
पेण येथील प्रसिद्ध रेडरॉक्स जिम व पनवेल येथील रुधिरसेतू या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पेणच्या महात्मा गांधी मंदिर वाचनालयात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर शिबिरामध्ये महिलांच्या स्तनाचे कॅन्सर व महिलांच्या गर्भाशयाचे कॅन्सरची मोफत तपासणी करण्यात आली. हजारो रुपयांच्या तपासणीच्या टेस्ट यावेळी मोफत करण्यात आल्या. तसेच चित्रफितेद्वारे कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यात आली. या शिबिरात मुंबई येथील ऑन्को केअर संस्थेचे कॅन्सर तज्ञ डॉ. देवेंद्र पाल व डॉ. प्रसन्न देशमुख यांनी रुग्णांची विनामूल्य तपासणी केली. यावेळी डॉ. महानंदा म्हात्रे यांचेही सहकार्य लाभले.
रुधिरसेतू सामाजिक संस्थे तर्फे गरजु रूग्णांची मोफत मेमोग्राफी टेस्ट व ईतर सहकार्य करण्याची ग्वाह संस्थेच्या वतीने उन्मेश लोहार यांनी दिली.
पेण तालुक्यातील महिलांमध्ये कॅन्सरची जनजागृत व तपासणीच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रेडरॉक्सच्या संस्थापिका तरन्नुम काजमी यांनी दिली. रेडरॉक्स च्या माध्यमातून वर्षभर वीरांगणा या नावाने हेल्थ अँड वेलनेस कॅम्प सुरू करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. या अंतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच महिलांना मोफत आहार मार्गदर्शन, पारंपरिक उपवास तंत्र व रोगमुक्ती, दैनंदिन जीवनातील व्यायाम व स्त्रियांमधील जिम विषयीचे गैरसमज या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी 120 महिलांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्याकरिता रेडरॉक्सचे संस्थापक अजित मोडक, रुधिरसेतू संस्थेचे डॉ. नरेंद्र दसरे, सुरेश रिसबुड, मुरलीधर ढाके, सचिन भिसे, अमोल साखरे यांचे सहकार्य लाभले.
Be First to Comment