सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
महाशिवरात्र दिनांच्या निमित्ताने तालुक्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाची रेलचेल पहावयास मिळाली विशेष म्हणजे तालुक्यात असलेले पुरातन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लांबच – लांब रांग पहावयास मिळत होती.विषेश म्हणजे आज उन्हाचा पारा वाढला असता तरी सुद्धा अनेक भक्ताने दर्शन घेतले.खोपोली येथे असलेले पुरातन विरेश्वर मंदिर येथे भजन,गायन तसेच नृत्य, तबला वादक असे मनोरंजन कार्यक्रम येथ करण्यात आले .
यावेळी या विरेश्वर मंदिर येथे लहान बालकलाकर यांनी उत्तम असे भजन गावून अनेकांना मंत्र मुग्ध केले. विविध गाण्यावर मुलींनी आपली नृत्य कला सादर करून आलेल्या भक्तांचे मनोरंजन करण्यात आले.या लहान मुलांमध्ये असलेली गुणांचे अनेकांनी कौतुक केले.उत्तम असे विविध गाणी नुत्य या महाशिवरात्र च्या दिनानिमित्ताने आयोजक रविंद्र कुलकर्णी, नृत्यांगणा तिर्था जोशी आणी महेश निमने यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी तबला व गायन सहभागी विदयार्थी हर्ष महेश निमणे, अमेय धावडे, समिक्षा देशमुख, वरद खराळ, जय ओसवाल, अथर्व कुलकर्णी, कार्तिक हुंनगुंद,रुद रानडे, कल्पित विदवंस, अन्मय नार्वेकर,
श्रेयस गोखले,गौरव साळवी,यश हुनगुंद अदि या कार्यक्रमात उपस्थित राहून आपली कला सादर करण्यात आली.

Be First to Comment