वडगांव येथे आई गावदेवी भवानी माता उत्सव
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
वडगांव गावामध्ये
असलेल्या आई गावदेवी भवानी मातेची मुर्ती ची गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.ही मुर्ती प्राचिन असल्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असा मंदिर बांधून या ठिकाणी या वर्षी प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे सलग दोन दिवस हा कार्यक्रम सुरु असून या मध्ये धार्मिक विधी समवेत महाप्रसाद चा लाभ आलेल्या भक्तगणांने घेतला.
गेले दोन दिवस सुरु असलेल्या उत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असून या ठिकाणी जणू यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते.या ठिकाणी करमणुकीचे साहित्य समवेत,विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.सामुदायिक काकडा,श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, भजन,तसेच देवीचे गाणी, वडगांव,आसरोटी,हातनोली,तुराडे,पौद,गोहे – चिंचवली यांनी म्हटले.त्याच समवेत पुण्यवाचन, ब्रम्हादी मंडल,मुख्यदेवता नवग्रह स्थापन,पुजन हवन,देवीची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरविण्यात आली.यावेळी या परिसरातील शेकडो वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याच बरोबर सायंकाळी ज्ञानाई हरिपाठ महिला मंडळ आसरोटी यांनी केले.या कार्यक्रमाचे सांगता ह.भ.प. विक्रांत महाराज पोंडेकर ( वारकरी शिक्षणसंस्था देवाची आळंदि यांनी उत्तम असे कीर्तन करुन जमलेल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ग्रामस्थ मंडळ वडगांव यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
Be First to Comment