सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शैक्षणिक वर्षात क्रिडा स्पर्धा चे आयोजन चिलठण हायस्कूल येथे विविध स्पर्धचे आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेत नैपुण्य गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आले.यावेळी या क्रिडा स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटी खोपोलीचे – चिलठण हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्याने याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करीत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जे.पी.दादा पाटील यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, या भागात असणारे आदिवासी व इतर गोरगरीब विद्यार्थीना शैक्षणिक वर्षांत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईन तर मराठी शाळेत ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी टाकले आहे, त्याचे मनापासून कौतुक करतो. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चित उज्वल आहे असे मत जे.पी.पाटील यांनी व्यक्त करीत गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वर्टशिला कंपनीचे व्यवस्थापक – बापूसाहेब नेणे, शशिकांत शेटी, बळीराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा उदयोजक जे.पी.दादा पाटील, बेबीताई पाटील, पौर्णिमा पाटील,.शेट्टी मॅडम सरपंच गौतम ओव्हाळ, उपसरपंच मारुती ढोकले, नितेश पाटील, मुख्याध्यापक वाभले सर आदीप्रमुखासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment