सिटी बेल ∆ पाताळगंगा ∆
देवन्हावे गावातील अभि युवा ग्रुप ने गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम, राबवित सामाजिक बांधलकी जपत आहे.छत्रपती विद्यालयातील ८ ,१० वी च्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन शिबीर खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहजसेवा फाऊंडेशनच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले.
या शिबिराला पोलीस उपनिरीक्षक हरिष काळसेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि जागरूकतेची महत्व विविध उदाहरणांद्वारे सांगून मार्गदर्शन करित विद्यार्थ्यांना संबोधित केले
वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळं लोकांचे आयुष्य अधिक सहज आणि सोपे झालं आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढता संगणक – इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांत होणारी वाढ ही चिंताजनक बाब बनली आहे. यात आर्थिक फसवणुकीची प्रकरणं आघाडीवर असताना व्यापारी – किशोरवयीन विद्यार्थी ही याला बळी पडण्याचं प्रमाण वाढू लागले आहे.मात्र आपण सातत्याने जागृत राहिले पाहिजे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अभि युवा ग्रुपने गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कपड्यांचे वाटप केल्याने अभि युवा ग्रुपच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक हरिष काळसेकर, सहजसेवा फाऊंडेशनचे, डाँ.शेखर जांभले, पोलीस अधिकारी बांगर, अँड.जयेश तावडे, यश पाटील, वीणा देशपांडे, जया आव्हाड, श्याम दिवटे आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment