Press "Enter" to skip to content

ग्रूप ग्राम पंचायत आसरे येथे नळपाणी योजनेचा भूमिपूजन

सिटी बेल ∆ काशिनाथ ∆
पाताळगंगा ∆

पाणी म्हणजे जिवन, कारण पाण्याशिवाय कोणताही सजिव जिवंत राहू शकत नाही.मात्र पाणी प्रत्येकाला मुबलक प्रमाणात मिळावे,या उद्दात विचारांतून जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ग्रूप ग्राम पंचायत आसरे येथे वडगांव जि.प.वार्डातील राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या ग्राम पंचायत हद्दीतील आसरे,धारणी आणी दोन आदिवासी वाडी येत असलेल्यांना ग्रामस्थांना मोरबे धरणांतून पाणी मिळत आहे.प्रत्येकाच्या घरोघरी नळ योजना सुद्धा आहे. मात्र लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी हवे तेवढ्या प्रमाणात महिला वर्गांस मिळत नव्हते.मात्र तर काही महिला वर्गांस पाणी मिळतच नव्हते यामुळे या परिसरात पाण्यांची टाकी बांधून सर्वांना मुबलक पाणी मिळेल या विचारांतून या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच बळीरामदादा जांभळे,उपसरपंच हरेश दुर्गे,ग्रामसेवक पोळ,सदस्य – योगेश नलावडे,बाळ्या कातकरी,जगदीश निकम, सदस्या – मेघा जांभळे,सुनिता पाटील,भागू डुकरे,वर्षा पवार,सुमन कातकरी ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सदस्य – नंदकुमार पाटील, ग्रामस्थ तुळशीराम डुकरे,रोहिदास पाटील,कालुराम दुर्गे,रमेश दुर्गे,गजानन ठाकूर,धनाजी डुकरे,विलास दुर्गे,संतोष जाधव,दीपक पाटील,कर्मचारी मोहन पोपटे अदि ग्रामस्थ,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.