60 जणांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
सिटी बेल ∆ श्वेता भोईर ∆ उरण ∆
कळंबोली येथे बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या शिबीरास कामोठे येथील स्वस्तिक ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. तर नियोजनासाठी सरस्वती इंजिनिअरींग कॉलेजच्या एन एस एस युनिटचे सहकार्य लाभले.
यावेळी कळंबोली माथाडी कामगार संघटनेचे संचालक संतोष शिंदे, तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी ( सीबीडी बेलापूर ) शहाजी कुंभार, सरस्वती इंजिनिअरींग कॉलेजच्या एन एस एस विभागाच्या प्रमुख सुनिता पाल, जय हिंद सेवा संस्थेचे ( घणसोली ) पदाधिकारी सुमित जाधव, तुषार शिंदे, सुशांत पाटील, प्रतिक शिंदे, ऋतिक जाधव, सचिव विशाल कावरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी रक्तदान करुन सेवाभाव जपला. तसेच गोरखनाथ मुटके, बांधिलकी प्रतिष्ठान मार्गदर्शक अविनाश म्हात्रे, अशोक घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळ बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, उपाध्यक्ष स्वप्निल मुटके, खजिनदार गौरव शिंदे, उपसचिव श्वेता भोईर (पत्रकार), सरचिटणीस सुदर्शन म्हात्रे, पदाधिकारी अनिरुद्ध जगताप, गितांजली सावंत, समीर जाधव, सदस्य आदित्य येवले, राहुल चव्हाण, प्रतिक्षा कापरे, श्रीगणेश रुपनवर, सचिन निंबाळकर, योगेश तुपसुंदर इत्यादी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हे शिबीर नेहमीप्रमाणे यशस्वीरित्या पार पडले.
बांधिलकी प्रतिष्ठानच्या सुरू असलेल्या कार्याबद्दल खूप खूप कौतुक. तसेच प्रतिष्ठाच्या समस्त तरुणाईला पुढील उपक्रमांसाठी व वाटचालीस शुभेच्छा. तुमच्या हातून असेच समाजकार्य घडत राहो. व भविष्यात जेव्हाही गरज लागेल तेव्हा माझ्या कडून मदत केली जाईल.
नासीर मणेर (आय आर एस) उपायुक्त – ठाणे, महसूल विभाग
Be First to Comment