जय भवानी महिला बचत गट आंबिवली तर्फे हळदी कुंकवाचे आयोजन
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
महिला वर्गांना विविध उपक्रमात सहभाग होता यावे,ह्या दृष्टीकोणांतून जय भवानी महिला बचत गट आंबिवली यांच्या माध्यमातून हळदि कुंकवाचे आयोजन आंबिवली येथे घेण्यात आले.प्रथम गणेश पुजन करुन,या संस्थेची माहिती देण्यात आली.नंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
आजच्या धावपळीच्या जिवनात महिला वर्ग एकत्र येणे शक्य होत नाही.मात्र हळदि कुंकू तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग एकत्र आल्या
यावेळी संगित खुर्ची,फुगडी,नृत्य आश्या विविध खेळ खेळण्यात आले.विशेष म्हणजे या खेळासाठी गृहपयोगी वस्तू बक्षिस म्हणून ठेवण्यात आले होते.
यावेळी जय भवानी महिला बचत गट आंबिवली अध्यक्षा – करुणा कि.जाधव,उपाध्यक्षा – शैला जाधव,सूत्रसंचालन – सुवर्णा जाधव,यावेळी पुनम जाधव,कमल र. पारिंगे,लता भोईर,सारिका ढवाळकर अदि उपस्थित होत्या त्याच बरोबर गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या.








Be First to Comment