Press "Enter" to skip to content

२६ मार्च रोजी पोलादपूर येथे साजरा होणार वर्धापन दिन

रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी मनोज खांबे यांची बिनविरोध निवड
कार्याध्यक्षपदी प्रशांत गोपाळे तर अनिल मोरे सरचिटणीस
उपाध्यक्षपदी मोहन जाधव, संजय मोहिते

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

रायगड प्रेस क्लबच्या सर्व साधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाड येथील दैनिक सागरचे प्रतिनिधी विद्यमान कार्याध्यक्ष मनोज खांबे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी पुढारी चे प्रतिनिधी प्रशांत गोपाळे तर अनिल मोरे सरचिटणीस, उपाध्यक्षपदी मोहन जाधव, संजय मोहितेे यांची देखील आदर्श नागरी पतसंस्था सभागृहात पार पडलेल्या सभेत निवड करण्यात आले मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव अनिल भोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोकण विभागीय सचिव अनिल भोळे,माजी अध्यक्ष अभय आपटे आणि विद्यमान अध्यक्ष भारत रांजणकर, सरचिटणीस शशिकांत मोरे, माजी अध्यक्ष विजय मोकल आदीसह सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

या सभेत रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन २६ मार्च रोजी पोलादपूर येथे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सोहोळ्यात विद्यमान अध्यक्ष भारत रांजणकर यांच्याकडून नियोजित अध्यक्ष मनोज खांबे हे पदभार स्वीकारतील.

मनोज खांबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी मध्ये कार्याध्यक्ष: प्रशांत गोपाळे, सरचिटणीस: अनिल मोरे, उपाध्यक्ष: मोहन जाधव, संजय मोहिते, खजिनदार: दर्वेश पालकर, सहसचिव: पद्माकर उभारे, सीमा मोरे, मुख्य संघटक: मानसी चेऊलकर, संघटक: नागेश कदम, संपर्कप्रमुख: भारत गोरेगावकर यांचा समावेश आहे.

या सभेत आदर्श नागरी पतसंस्थाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पाटील यांचा रायगड प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी मिलिंद अष्टिवकर यांची आणि विभागीय सचिव अनिल भोळे तर संपर्क प्रमुख म्हणून कमलेश ठाकूर यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. सभेचे संचलन सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी तर आभार प्रदर्शन संपर्क प्रमुख भारत गोरेगावकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.