संपत्तीच्या हव्यासापोटी प्रियकराच्या मदतीने वहिनीने भावाला जीवेठार मारल्याचा बहिणाचा आरोप
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नीनेच पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत चंदन जैन यांच्या बहीण पुष्पा प्रकाश गांधी (वय-45 वर्षे व्यावसाय गृहीणी, रा. पालनवोजपाल बिल्डी, ए-62. पहीला मजला, एस. के. बोलेरो, दादर पश्चिम, मुंबई,) यांनी
मुरुड पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
याबाबतचे वृत्त असे, मुरुडमधील व्यापारी चंदन जैन यांना आनुवंशिक स्नायूंच्या आजारी आहेत. काही महिन्यांपूर्वी ते खूप आजारी होते. त्यांना संडासचा त्रास सुरू होता यासाठी चंदन जैनउर्फ पप्पू यांच्या पत्नी पायल जैन(बाजारपेठ, मुरूड,रायगड) हिने आपला साथीदार मंजर महमद अली जुईकर(नागोठणे, तालुका-रोह,रायगड) याच्या सल्ल्यानुसार चंदन जैन यांना झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली होती.झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन झाल्याने त्यातच चंदन जैन यांचा मृत्यू झाला.
हे सारे पायन जैन यांनी मालमत्ता मिळावी याच हेतूने केले असल्याचा आरोप चंदन जैन यांची बहीण पुष्पा प्रकाश गांधी यांनी केला. त्यासाठी प्रत्यक्ष काही पुरावे व मोबाईल कॉल रेकॉर्ड याचा आधार घेत करून मुरुड पोलिसांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. याबाबतची फिर्याद गांधी यांनी नोंदवली होती. पुष्पा प्रकाश गांधी हिने मुरुड पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता.
परंतु पोलीस पुरावे तपासण्याची कारणे सांगून गुन्हा दाखल करत नसल्याने पुष्पा हिने शिवसेना भवन गाठले व आपली कैफियत ठाकरे सेनेच्या नेत्या सीमा राऊत यांनी सर्व बाजू समजून घेऊन तातडीने रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना बाबत विनंती केल्याने रायगड अधीक्षक यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्याने पत्नी पायल जैन व साथीदार मंजर महमद अली जुईकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरील सर्व घटना व पुरावे तपासून अखेर मुरुड पोलिसांनी चंदन जैन यांची पत्नी पायल जैन व साथीदार मंजर महमद अली जुईकर यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे करीत आहेत.
Be First to Comment