सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास मंच विभागाच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर लहारे सर होते, या वेळी प्रा संतोष लंकेश्वर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. निलेेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक, श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. रशगे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक मानवी हक्क हा दिवस भारतात व जगात का साजरा करतात हे सांगुन मानवी हक्क कोणते आहेत हे प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांना पटवून दिले महिला विकास मंचाच्या प्रमुख प्रा सौ. दिपाली पाठराबे यांनीही आपले विचार व्यक्त करून सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमास मा. प्राचार्य, डाॅ. श्रीनिवास जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी- स्वयंसेवक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी एन एस एस स्वयंसेवकांनी विषेेश परिश्रम घेतले.








Be First to Comment