Press "Enter" to skip to content

धाटावमधे ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर ४८ वी कुमार- मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

खो-खो खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आ.अनिकेत तटकरे

सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆

क्षणदेशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाचा प्रचार आणि प्रसार करीत या खो खोच्या खेळाबाबतची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार तथा रायगड खो खो असोसिएशनचे जिल्ह्याध्यक्ष अनिकेत तटकरे यांनी केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील धाटावमधे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालयात ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर आयोजित ४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या नियोजनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यासमयी महाराष्ट्र खो खो असो.चे उपाध्यक्ष विजय मोरे,अलंकार कोठेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी रोहा तालुकाध्यक्षा प्रीतम पाटील,सचिव स्नेहा ताडकर,अनंत मगर,अमित मोहिते,सतीश भगत,महेश बामुगडे,अंकुश ताडकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आ.अनिकेत तटकरे म्हणाले की,आदरणीय शरद पवार साहेब ८२ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या खो खो खेळाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे म्हणून जि.प.शाळांना निमंत्रित करणार आहोत. याठिकाणी २४ संघ मुलांचे व २४ संघ मुलींचे असून प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील यात एकूण १२५ खेळाडू खेळतील, त्याचप्रमाणे पंच कमिटी, नियोजन समिती असेल.सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रात या स्पर्धा होणार असून येणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था सुद्धा चोखपणे केली जाणार आहे.याठिकाणी ४ क्रीडांगण असून गॅलरी मद्ये अंदाजे २ हजार क्रीडारसिक आनंद घेतील असे उत्तम नियोजन असेल. खो खो खेळ हा दोन चार गावापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यात पसरविण्याचे काम करणार आहोत आणि यातूनच जिल्ह्यातून चांगले संघ निर्माण होतील यासाठी प्रयत्न राहणार आहेत.याठिकाणी स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची चालना दिली जाईल.

धाटावमधे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालयात ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर होणाऱ्या ४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून याठिकाणी उत्तम नियोजन आणि संयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सह तालुकाध्यक्ष यांसह सर्व पदाधिकारी विशेष मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.