जसखार येथे स्व.गुलाबभाई म्हात्रे मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
जसखार गावचे प्रेरणास्थान स्वर्गीय गुलाब भाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरास रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदान केले.
सतत 51 वेळा रक्तदान करण्याचे माझे मानस पूर्ण झाले व स्वर्गीय गुलाब भाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ घेतलेले हे रक्तदान शिबिर सर्व युवकांसाठी तसेच आपल्या समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.कै.गुलाब भाई म्हात्रे यांची स्मृती अशाच सत्कार्यातून समाजापुढे यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे मनोगत विजय भोईर सदस्य जिल्हा परिषद रायगड यांनी व्यक्त केले.
जसखार येथील स्व. गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्व. गुलाब भाई मित्र मंडळ जसखार यांच्या वतीने केतन म्हात्रे यांनी जसखार येथील रत्नेश्वरी मंदिरात भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी विजय भोईर बोलत होते.
यावेळी विजय भोईर यांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सदर रक्तदान शिबिरात एकूण 150 दात्यांनी रक्तदान केले.सदर शिबिराच्या उदघाटन प्रसंगी जे. एन. पी. टी. चे विश्वस्त दिनेश पाटील,विश्वस्त रवी पाटील, शिवसेना महालन माजी विभाग प्रमुख मधुकर शेठ ठाकूर, रत्नेश्वरी मंदिर जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष रविकांत ठाकूर, एस आर एल उद्बोजक सुदीप पाटील, माजी सरपंच काशीबाई ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत सदस्य दिपक ठाकूर, ग्राम सुधारणा अध्यक्ष संजय तांडेल, उपसरपंच शैलेश ठाकूर, माजी सरपंच नितीन आत्माराम पाटील, माजी उपसरपंच रविंद्र ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य परेश ठाकूर, उपसरपंच प्रतीक्षा ठाकूर, अरुण ठाकूर, प्रमोद पाटील, नरेश घरत, दिनेश ठाकूर, राजन तांडेल, सुनिल ठाकूर, अविनाश ठाकूर. नंदकांत ठाकूर यांच्यासह कच्छ युवक संघ नवी मुंबई चे चंद्रकांत देढिया,शंकर शास्त्री, जयंती लाल छेडा, रंजित भाई बावड, नरोत्तम भाई राजभोर, तेज बहाद्दूर आदी मान्यवरांसह स्व. गुलाब भाई मित्र मंडळाचे सदस्य व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शुगर, रक्तदाब तपासणी, शरीरातील कॅल्शिअम तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त, उत्तम प्रतिसाद लाभला.सदर शिबिराचे शानदार निवेदन हितेश अशोक म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment