भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन साजरा ; २६/११ हल्यातील शहिदांना मानवंदना
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधान दिन साजरा करण्यात आला.सकाळी पुष्प हार अर्पण करून त्याच बरोबर हिंदूचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस हार घालण्यात आले. त्याच बरोबर मुंबई येथे झालेल्या २६/११ ह्या हल्यामध्ये शहीद झालेल्या त्यांस मानवंदना देण्यात आली.
भारतीय राज्यघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध संस्था, संघटना, सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये शनिवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.उपस्थितांनीही पाठोपाठ संविधान सामूहिक वाचन आले.
यावेळी अविनाश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच मुंबई येथे झालेल्या २६/११ या मध्ये आपल्या प्राणाची हाहुती देवून स्वता शहिद झाले त्यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव,मा. उपसरपंच नितीन महाब्दी, भरत जाधव. ग्रामसेवक संदीप धारणे, शिवाजी शिंदे,वारद आर.पी.आय. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष – अविनाश कांबळे , विलास कांबळे, आर.पी.आय. खालापूर तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत भाई कांबळे. एस.के, कर्मचारी अशोक कांबळे संतोष काठावले भिवा देशमुख. अध्यक्ष खालापूर तालुका ऑल इंडिया पॅंथर विलास कांबळे, वसंत कांबळे, वामन कांबळे, अनंता कांबळे, देवराव कांबळे, उल्हास कांबळे,पांडुरंग गायकवाड, प्रफुल कांबळे, वैभव कांबळे,महिला उपाध्यक्ष खालापूर तालुका – मीना कांबळे, खालापूर अध्यक्ष विनायक गायकवाड, सम्राट नगर अध्यक्ष नम्रता कांबळे आणि महिला वर्ग तसेच विद्यार्थी शिक्षिका नंदा पाच पिंडरेखा जाधव उपस्थित
होत्या.








Be First to Comment