सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
गीता जयंती निमित्ताने विश्व हिंदू परिषद-बजरंग दल कर्जत प्रखंड, मातृ सक्ती, दुर्गा वहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने घटकोपरच्या समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 93 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी संयोजित केलेले कर्जत खालापूर तालुक्यातील 462 वे रक्तदान शिबिर ठरले.
कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन नगरसेविका स्वामीनी मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे, कुलाबा जिल्हा बजरंग संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये आदी उपस्थित होते. सर्वप्रथम रोशन अगज आणि कौस्तुभ करमरकर यांनी रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला.
या शिबिरात 93 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समर्पण ब्लड सेंटर, घाटकोपरच्या डॉ. एम. ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल कांबळे, लक्ष्मण नाईक, प्रदीप नितोरे, सोहन जाधव, अनिकेत जाधव, सूरज जाधव, राजेश विश्वकर्मा, विजय मोहिते यांनी रक्तसंकलन केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, राजाभाऊ कोठारी, सुनील गोगटे, दिनेश रणदिवे, गणेश ठोसर, बिनीता घुमरे, दीपक बेहेरे, दिपक गायकवाड, प्रसन्न खेडकर, कमलाकर किरडे, दया हजारे, सचिन ठाकूर, केदार भडगावकर , मयुरेश चौधरी , प्रतीक पाटील , अनंता हजारे, विनोद बडेकर, दीपक डवरी, अविनाश बैलमारे, रोहित चव्हाण, दिलीप कवाडकर आदी उपस्थित होते.
Be First to Comment