Press "Enter" to skip to content

शेतकरी लहू पाटील आनंदीत

एसआरटी पद्धतीने कर्जत ९ या भाताचे भरघोस पीक

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील सापोली येथील प्रगत शेतकरी लहू पाटील या शेतकऱ्यांनी एसआरटी पध्दतीने शेतीत कर्जत ९ या भात बियाण्याची लागवड करून आता भरघोस पीक घेतल्याने ते आनंदीत झाले आहेत.

पेण तालुका कृषी सहाय्यक व्ही.एस.लाडगे यांनी सदर शेतकऱ्यांना शासनाच्या आधुनिक पद्धतीने शेती कशी करावयाची यांची माहिती देऊन याबाबत शेतकऱ्यांना जागृत करून एसआरटी पद्धतीत अल्प खर्च, मजूरही कमी आणि यातून भरघोस येणारे पीक यांची सांगड घालत शेतकरी लहू पाटील यांनी यांचा फायदा घेतला शेतीत एसआरटी नुसार बेड तयार करून एक मिटरच्या साच्यानी बियांनाची पेरणी करून चारसुत्री लागवड करण्यात आली.या मध्ये सापोली पिंपळगाव येथील जवळपास १० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला महिलाही मोठ्या प्रमाणात याकडे वळल्या असून लहू पाटील यांच्या अर्धा एकर (.५०) आर क्षेत्रात कर्जत ९ बियांनाला किटकनाशक औषध तसेच गवतासाठी फवारणी या सर्व गोष्टी करून चारसुत्री बेड वर यांची लागवड केली याचा फायदा जमीनीत या अगोदर कधी नव्हे येणारे ते पीक आले असून यातून सदर शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेतला आहे.येणा-या काळात पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली भुमाता ओसड न ठेवता शासनाच्या एसआरटी पध्दतीने लागवड करून आपल्या जमीनीतून सोन्यासारखे पीक घ्यावे असे आवाहन लाडगे यांनी केले आहे.

राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत मात्र त्याचा उपयोग फार कमी प्रमाणात होतो मला संबंधित अधिकाऱ्यांनी एसआरटी शेती कशी करावी याची माहिती दिली असता मी स्वता ती हे भरघोस पीक घेऊन आत्मसात केली आहे.खरच यात वेळ, खर्च, माणसं या सर्वांची बचत होऊन आपल्य हातात सोन्याचे पीक येत असल्याचे प्रगतशील शेतकरी आणि सापोली ग्रामपंचायतीचे सरपंच लहू पाटील यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.