सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
नवीन पनवेल परिसरातील राहत्या घरात २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. रूपेश विश्वास यमगर (रा. श्री सिद्धी गणेश सोसायटी सेक्टर ६, नवीन पनवेल) असे या तरुणाचे नाव आहे.
स्विगीमध्ये कामाला असलेल्या रूपेश याने अज्ञात कारणावरून घरातील पंख्याला नायलॉनची दोरी बांधून त्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Be First to Comment