सिटी बेल ∆ खंडाला ∆
रायगड तायक्वांडो असोसिअशन हि एकमेव रायगड जिल्ह्यामध्ये अधिकृत संघटना असून या संघटनेला तायक्वांडो असोसिअशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांडो फेड्रेशन ऑफ इन्डीयाची मान्यता आहे, या संघटने मार्फत डी कावसजी हायस्कूल खंडाला येथे तायक्वांदोचे ट्रेनिंग कॅम्पचे पाच दिवस आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये रायगड व नवी मुंबईतून २०० च्या अधिक तायक्वांडो पटुणी सहभाग नोंदिवला, या शिबिरामध्ये रोज ८ ते १० तास मुलांचा सराव करून घेतला या शिबिरामध्ये बेसिक ते अडव्हानस फायटिंग स्कील व टेक्निक किक पंच यांचा योग्य वापर, गती निर्माण करण्याची ट्रेनिंग देण्यात आली. या शिबिरामध्ये ४ तर ५ वर्षाची मुले मुली सहभागी झाल्या होत्या.
या शिबिराला विशेष मार्गदर्शन ७ डिग्री ब्लक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष पाटील सर, तसेच सहाय्यक प्रशिक्षक प्रभाकर भोईर, सदानंद निंबरे, प्रशांत घरात, सचिन मोरे, अनिल म्हात्रे, राकेश जाधव, तेजस माळी, संतोष पालेकर इ. सहकार्य लाभले.
या शिबिरामध्ये बेस्ट कॅम्प चम्पिअन मुलीमध्ये रीयांशी सावलेकर व मुलांमध्ये ध्रुव गुंजाले हे मानकरी ठरले व बेस्ट फायटर म्हणून मानसी शर्मा हिला सन्मानित करण्यात आले.
Be First to Comment