सिटी बेल ∆ उरण ∆ हरिष म्हात्रे ∆
ही भूमी संतांची , ही भूमी थोर लढवय्या स्वातंत्र्य सेनानीची ही भूमी माझ्या रयतेच्या राजा थोर शिवकल्यानं कीर्तिवंत यशवंत राजा महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र संरक्षण करिता बांधलेले गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची ही जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकांची आहे.
गडकिल्ले आणि त्याच महत्व येणाऱ्या भावी पिढीला समजाव यासाठी सारडे विकास मंच तर्फे सलग पाच वर्ष दिपावली निमित्य गडकिल्ल्याच आयोजन केले जात दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही या स्पर्धेत 35 हुन अधिक किल्ले सहभागी झाले आहेत.
यामधे रायगड , प्रतापगड, त्रिकोना, कर्नाळा,आशा किल्याच्या प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न मुलांनी केला.

यामध्ये रचित म्हात्रे यांना प्रथम क्र. तर रूद्र पाटील याला द्वितिय क्र. देऊन सन्मानित करण्यात आले. तर ,संस्कृती म्हात्रे,जय पाटील,अंश ठाकुर, राजेश पाशी,स्वाद पाटील, रिद्धी पाटील, आशा सहा स्पर्धकाना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इतर सर्व सहभागी झालेल्या स्पर्धांना रोहित पाटील,आणि नितिन म्हात्रे याच्या मार्फत दिपावली ची सुंदर भेट देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील सर, सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, न्हावा शेवा सिएचए संघटनेचे सचिव हरिष म्हात्रे, खजिनदार मिलिंद म्हात्रे, सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरेचे नंदकुमार तांडेल, प्रशांत म्हात्रे सर,रोहित पाटील, त्रिजन पाटील, प्रणय ठाकूर,विवेकानंद ठाकुर आदी मान्यवरांच्या शुभ हस्त हा कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे व आभारप्रदर्शन च काम सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment