बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांचे ग्रामपंचायतीला खबरदारी घेणेबाबत पत्र
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यू रुग्ण सापडला असल्याने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी बोर्ली ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी यांना पत्र देऊन गावामध्ये डेंग्यू साथ नियंत्रणात आणण्याचे दृष्टीने काही महत्वाच्या उपाय योजना कराव्यात याबाबत पत्र दिले आहे
बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी बोर्ली ग्रामपंचायत ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,मौजे बोली येथे डेंग्यु रुग्ण सापडले असुन सदरची साथ नियंत्रणात आणण्याचे दृष्टीने काही महत्वाच्या उपाय योजना गरजेचे आहे. तरी ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालनही करावे.
त्याचप्रमाणें बोर्ली गावात दवंडी व्दारे जनतेला घरातील व घराबाहेरची स्वच्छता करणे. अंगणात किंवा परसात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यकता नसल्यास जास्तीचे पाणी साठा न करणे तसेच पाणी साठयाची गरज असल्यास भांडी ही स्वच्छ फडक्याने झाकुन ठेवणे. आठवडयातुन एक दिवस (मंगळवार) कोरडा दिवस पाळणे. तसेच शौचालयाच्या गॅस पाईपच्या तोंडाला मच्छरदाणीच्या जाळीने बांधुन घेणे जेणे करून शौचालयाच्या टाकीतील डास बाहेर येउन साथ प्रतिबंध होउ शकतो या बाबत जनतेला दवंडीव्दारे कळविण्यात यावे. तसेच आपले ग्रामपंचायती कडील धुर फवारणी मशिनव्दारे संपुर्ण गावात फवारणी करून घेतल्यास डासांचा प्रतिबंध करणे शक्य होईल. वरिल प्रमाणे उपाय योजना केल्यास डेंग्युची साथीचा प्रतिबंध व नियंत्रणात आणने शक्य होईल. तरी वरील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.
Be First to Comment