सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
मुरूड तालुक्यातील काशीद पुलाखाली तसेच बारशिव येथील कोलंबी प्रकल्पाच्या मागील बाजूस समुद्रकिनारी गोवंशीय जनावरांचे तुकडे सापडले असल्याची घटना घडली आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद सहाय्यक फौजदार रमण महाले यांनी दिली आहे.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, मुरूड तालुक्यातील काशीद पुलाखाली तसेच भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बारशिव येथील कोलंबी प्रकल्पाच्या मागील बाजूस दिनांक19 ऑक्टोबर2022 रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्याकरिता संगतमत करून लबाडीच्यादृष्टीने चोरून गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर हत्या केली आहे. अशी माहिती मुरूड व रेवदंडा या दोन्ही पोलीस ठाण्यास मिळाली .
दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गोवंशीय जनावरांचे रक्त हे बारशिव येथील कोलंबी प्रकल्प लगत आढळून आले.तसेच त्या ठिकाणी काही तुकडेही आढळून आले.तसेच त्याचा काही भाग हा दिशाभूल करण्यासाठी मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील काशीद गावानजीक असणाऱ्या पुलाखाली टाकण्यात आला होता. घटनास्थळी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी उशिरा भेट देऊन पाहणी केली आहे.
मुरूड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत अनेक गुरे ही चोरीला गेली आहेत त्याचा तपास आजपर्यंत लागला नाही .काही शेतकरी यांचे म्हणे आहे कीटेम्पोमध्ये गुरे चोरून नेली असता ती साळाव,शिघ्रे, मांडाद किंवा खारी या पोलीस तपासणी नाक्यावरून गेली असतील मग पोलिसांना याची माहिती नाही का ? असाही सवाल आता होत आहे.
Be First to Comment