सिटी बेल ∆ तळोजा ∆
दिपक फर्टीलिलाझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशन व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पाले खुर्द येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरास तळोजा विभागातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३३१ रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यातील १६० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, त्यांचे ऑपेरेशन पनवेल येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे दिपक फर्टिलायझर मार्फत मोफत केले जाणार आहे. तसेच ९६ रुग्णांना दृष्टी दोष असल्याचे निदान झाले असून सदर रुग्णांना दिपक फर्टिलायझर्स मार्फत अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन श्रीमती पल्लवी नरेश मेहता तसेच श्री. अरुण शिर्के-एव्हीपी कॉर्पोरेट अफेयर्स, श्री. देवेंद्र कदम- एजीएम-बॅगिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री संदीप काकडे- सिनिअर मॅनेजर-सी एस आर दिपक फर्टिलायझर, श्री योगेश पाटील- प्रकल्प वव्यवस्थापक ईशान्य फाउंडेशन व टीमने शिबिराचे नियोजन केले. श्री आबा पाचघरे व नेत्रचिकित्सक टीम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांनी नेत्र तपासणी केली.
Be First to Comment