श्री सच्चिदानंद सद्गुरु साईबाबांच्या भेटीस आल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका
सिटी बेल ∆ पनवेल ∆
दोन दत्तावतरांच्या भेटीच्या दुग्ध शर्करा योगात श्री साई संस्थान वाहाळ येथे भक्तांना अमृत वर्षावाची अनुभूती मिळाली. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांनी तब्बल बारा वर्षे वापरलेल्या पादुका श्री साई संस्थान वहाळ येथील साई मंदिरामध्ये आल्या होत्या. त्यांची विधीवत पूजा झाल्यानंतर साग्रसंगीत आरतीचा अनुभव घेत भक्त मंडळींनी मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी श्री साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील यांनी यावेळी पादुका पालखीचे स्वागत केले.यावेळी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पार्वती ताई पाटील, साईचरण पाटील,शेकाप उरण तालुका चिटणीस विलास नाईक,उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, अभिनेते मयुरेश कोटकर, वेश्वी येथील केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष राजू मुंबईकर, पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर आदी मान्यवरांच्या सह भक्त संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.








Be First to Comment