सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
ग्रामीण रुग्णालय चौक या ठिकाणी ग्रेस फुल हॅन्ड संस्थेमार्फत गरोदर महिलांना पोषक आहार म्हणून खजूर,चिक्की,शेंगदाणे लाडू, फळे,चणे,अदि वस्तुचे वाटप महिलांना करण्यात आले. त्याचबरोबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता काळेज यांनी गरोदर महिलांना पोषक आहारा विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात केले.
यावेळी साहाय्यक संचालक पुणे डॉ. सुमेध आंदुरकर यांनी यांनी देखील महिला आरोग्य व पोषक आहार पोषक याविषयी मार्गदर्शन केले. सोबत ग्रामीण रुग्णालय चौकाचे समुपदेश अशोक लोंढे यांनी यावेळी एड्स या आजाराविषयी मार्गदर्शन केले व त्यापासून सावध राहण्याविषयी तसेच बाळाचे संगोपन व गरोदरपणातील तपासण्या याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सुमेध आंदुरकर यांच्या हस्ते गरोदर महिलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामीण रुग्णालय चौक चे सर्व स्टाफ,कर्मचारी तसेच या संस्थेचे अध्यक्ष पायल माधोक त्यांचे सहकारी उपस्थित होते.








Be First to Comment