जयपूर फूट, २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया, विविध तपासण्या आणि औषधोपचार, अपंगांना तीन चाकी सायकल, नेत्र तपासणी व चष्मे वाटप
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
सिटी बेल ∆ पनवेल ∆
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.

यंदा हा १३ वा महाआरोग्य शिबीर असून या महाशिबिराचे उदघाटन सकाळी ९ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ० ते १८ वयोगटापर्यंत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, देण्याबरोबरच मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट बसविण्याचे शिबीरही यावेळी होणार आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले आहे.








Be First to Comment