सिटी बेल ∆ पाणदिवे ∆ मनोज पाटील ∆
आर एस पी च्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या नियोजना संदर्भात कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात नवी मुंबई, ठाणे व रायगड च्या आर एस पी च्या शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात करण्यात आली होती .या कार्यशाळेतआर एस पी चे १२० शिक्षक व शिक्षिका सहभागी झाले होते.
शालेय अभ्यासक्रमातुन व पोलीस विभागाच्या सहकार्याने वाहतूक व रहदारीच्या नियमांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे या बाबतीत शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन व माहिती मिळावी यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुषोत्तम कराड -पोलीस उप आयुक्त वाहतूक नियंत्रण विभाग पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांनी स्वतः शिक्षकांना याबाबत मार्गदर्शन केले व दिवाळी नंतर पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आर एस पी विद्यार्थ्यांचे शिबिर तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाईल असे जाहीर केले. तसेच
यावेळी पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी एम. व्हि .विधाते, पोलीस मुख्यालय कळंबोली चे आर पी आय कृष्णा धमपुरकर, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अंकुश पाटील, कळंबोली वाहतूक शाखेचे निशिकांत विश्वाकार, मुंबई विभाग आर एस पी सहसचिव श्री सुभाष मोरे तसेच कोकण विभागीय समादेशक हिराजी पाटील यांनी मार्गदर्शन केले .
अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन विषयी विशेष प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी निवृत्त उपसमादेशक यशवंत पाटील तसेच दिलीप देशमुख, बबन सावद,यांचा सन्मान पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कोकण विभागीय समादेशक हिराजी पाटील यांनी भुषविले तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक सुधागड हायस्कूल कळंबोली चे प्राचार्य व आर एस पी चे कार्याध्यक्ष राजेंद्र पालवे यांनी केले सदर कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन आर एस पी समादेशक विलास पाटील , कार्यकारिणी सदस्य शितलकुमार शिंदे,हणमंत डुबल सुनिल धनावडे, गिरीश पाटील, सचिन खराटे, नजिर शेख, वैशाली पटाडे,शरद कुंभार, प्रियंवदा तांबोटकर, भिमराव सोनावणे, सचिन जाधव, राजेंद्र सोनवणे, ललिता सिंह, नलिनी पाटील, विलास गायकर, दिलिप गोंधळी,देवेंद्र म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment