सिटी बेल ∆ पाणदिवे ∆ मनोज पाटील ∆
उरण तालुक्यातील दिघोडे येखील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर जंयती व शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिघोडे विभागीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायण कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.
या वेळी प्रमुख म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानप्रकाश जनार्दन पाटील ,शालेय शिक्षण समितीचे सभापती अविनाश नारायण पाटील , उपसभापती गणेश जयराम पाटील, प्राचार्य नाथा नाईक ,डॉ .मनिष पाटील , नरेश डाकी, जयराम पाटील, प्रभाकर मुंबईकर ,नरेश पाटील , क्रांती जोशी , बी . एम . ठाकूर,,अनंत भोकाजी पाटील, मदन पाटील , ए . जे . पाटील, ए . डब्ल्यू नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्षक्रमाच्या वेळी या वर्षीचा प्राचार्य नाथा नारायण नाईक पुरस्कृत “आदर्श शिक्षक पुरस्कार ” एम . जी . शिवभगत यांना जाहिर झाला होता सदर पुरस्कार वितरण या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.
सन्मानचिन्ह, आकर्षक प्रशस्तिपत्र , रोख ५०००रूपये , शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून श्री.शिवभगत यांना गौरविण्यात आले.प्राचार्य नाथा नाईक यांंनी सुरू केलेल्या शाळेतील गुणवंत शिक्षक परस्काराबद्दल त्यांचे दिघोडे परिसरांतून कौतुक होत आहे.








Be First to Comment