पनवेलमध्ये मॅरेथाॅनला पंधरा हजारांपेक्षा जास्त सहभाग
सिटी बेल ∆ पनवेल ∆
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये नुकताच बिंग स्ट्राँग पनवेल मॅरेथॉन 02 ऑक्टोंबर 2022 या दिवशी विशाल प्रजापती राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण व रायगड अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक यांच्यावतीने मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंधरा हजारांपेक्षा जास्त स्पर्धेकांनी सहभाग घेत हम फिट है’ असा एक प्रकारे संदेश दिला. ही मॅरेथाॅन पाहण्याकरीता मोठया प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.
राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण व रायगड अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक विशाल प्रजापती यांच्या वतीने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे बिंग स्ट्राँग पनवेल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तम नियोजन आणि मोठया संख्येने उपस्थितीती हे या मॅरेथाॅनचे वैशिष्टय पाहायला मिळाले. फिटनेसचा संदेश देत मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, कर्नाळा स्पोर्ट्स अध्यक्ष मुकुंद म्हात्रे, अध्यक्ष एस.के.नाईक, रायगड जिल्हा ऍथलेटिक असो. अध्यक्ष प्रवीण खुटारकर, अमिस मोमया, शशिकांत शर्मा, शमा हंटगडी, हे उपस्थित होते. त्याचबरोबर अमीस निरंजन मोमाया इंडियन ऑइल सर्वे व जेके टायर व एनर्जी ड्रिंक प्रेडेटर गोल्ड स्ट्रिके यांनी मदत केली होती. एनसीसी सपोर्ट एम पी एस सी कॉलेज पनवेल श्री कॅप्टन आर एस जमनुके यांनी मदत केली होती.
या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक म्हणून कल्पेश मंगेश कामडी, श्रीदेवी, शिवाजी तराळ, विशाल प्रजापती हे आयोजक म्ह्णून कार्यक्रमाचे नियोजन उत्तम करण्यात आले होते. या मॅरेथाॅनमध्ये हम भी फिट’ असल्याचे जणु काही सांगत होते.
Be First to Comment