Press "Enter" to skip to content

रोहा सिटिझन फोरमचा उपक्रम !

रोहयात 144 जणांची नेत्र तपासणी ; 56 मोतीबिंदू रुग्णांना शास्त्रकियेसाठी पाठविले !

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆

रोहा येथिल नेत्र रुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी 144 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 56 रुग्णांना आजच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. गेल्या चार महिन्यांत रोहा सिटिझन फोरम ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 281 नेत्ररुग्णांंना नवी दृष्टी मिळाली आहे.

रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शासकीय विश्रामगृह दमखाडी, रोहा येथे झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, आणि मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर पार पडले.

हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉक्टर संदेश रसाळ, नंदिनी देवधरकर, अश्विनी पाटील, राजदीप कौर, नरेश आवलर, ज्ञानोबा कांबळे आदींनी रुग्णांची तपासणी केली.

रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक प्रदिप देशमुख, सल्लागार दिलीप वडके, श्रीकांत ओक, अहमदशेठ दर्जी, उस्मानभाई रोहेकर, संतोष खटावकर, महेश सरदार, संदीप सरफळे, इल्यास डबीर, दिनेश जाधव, शैलेश रावकर, सचिन शेडगे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, राजेश काफरे, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, भावेश अग्रवाल आदी फोरम च्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.