सिटी बेल ∆ उरण ∆
ज्येष्ठ कवी/साहित्यिक/पत्रकार श्री. सुरेश द. म्हात्रे. (जासई.) यांचा ७५ वा अमृत महोत्सवी जन्मदिन त्यांच्या जासई येथील निवासस्थानी उत्साहात साजरा झाला.
हिम्मत नगरी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. विशाल म्हात्रे आणि कार्यकारिणी या सर्वांनी श्री. म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या. कवी/ साहित्यिक- श्री. के. एम. मढवी, श्री. हरिभाऊ घरत, श्री, हरिश्चंद्र माळी यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छांसह कविता सादर केल्या.

या आनंदमय प्रसंगी- श्री, सुरेश म्हात्रे यांची पत्नी, बंधू, भगिनी, मुले, सुना, भाचे, पुतणे, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार उपस्थित होता. सर्वांनी औक्षणासह श्री. म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या. बंधू- श्री. रमेश द. म्हात्रे, आणि कविश्री- अरुण द. म्हात्रे तसेच जावई श्री. महेश ठाकूर यांनी मनोगतासह शुभेच्छा दिल्या. शेवटी सत्कारमूर्ती श्री सुरेश द. म्हात्रे. यांनी कविता सादरीकरणासह आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे सोहळा आनंदात संपन्न झाला.








Be First to Comment