कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसानांच केली मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल
सिटी बेल ∆ याकुब सय्यद ∆ नागोठणे ∆
नागोठणे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपतीर पाडा परिसराच्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज टाऊनशिप येथे नागोठणे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक नितीन यशवंत गायकवाड हे अक्षय सुनील बुरसे व काशिनाथ वामन सुतार यांच्यासह लोकसेवक म्हणून नेमून दिलेल्या शासकीय पोलीस कर्तव्य सार्वजनिक कार्य पार पाडत असताना शिहु येथील राहुल प्रेमराज पिंगळे व प्रणित प्रेमराज पिंगळे, अक्षय पिंगळे तसेच एक अज्ञात व्यक्ती यांनी पोलीस नाईक नितीन यशवंत गायकवाड व अक्षय सुनील बुरसे यांना जाणीवपूर्वक फौजदारी धाक दाखवून ते करत असलेल्या लोकसेवक कार्यापासून प्ररावृत्त करण्याचा प्रयत्न करून जाणीवपूर्वक दुखापत करत लोकसेवकाचे कार्य पार पाडत असताना त्यांच्यावर जीवघेणे हल्ला केला.
चार जणांनी फौजदारी बलाचा वापर नितीन यशवंत गायकवाड यांची गलपट्टी पकडून गळा दाबून लाथा बुक्क्याने मारहाण केली त्याचवेळी सोडवण्यासाठी अक्षय सुनील बुरसे त्याला हि लाथा बुक्क्याने मारहाण केली सदर काशिनाथ सुतार यांना प्रणित पिंगळे यांनी त्यांचे डाव्या बाजूला चावा घेऊन गंभीर दुखापत केल्या त्यानंतर प्रणित पिंगळे हे त्याच्याकडील लाल रंगाची स्विफ्ट गाडीत पळून जात असताना गाडी पुढे घेऊन गाडीला यु टर्न घेत उजव्या बाजूला नितीन गायकवाड सह उभे असलेले अक्षय बुरसे व काशिनाथ सुतार यांच्याकडे गाडीचा एक्सीलेटर जोरात दाबून गाडीचा वेग वाढवून गाडी चुकीच्या मार्गाने आणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर नितीन गायकवाड यांच्यासह दोघांनी आपल्या जीव वाचवण्यासाठी बाजूला उड्या मारल्या त्यानंतर चार जण हे अति वेगाने गाडी घेऊन गेटच्या बाहेर पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच रोहा येथील उपविभागीय पोलीस कार्यालयाचा अतिरिक कार्यभार असलेले महाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली याप्रकरणी नागोठणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप हे पुढील अधिक तपास करीत आहेत.








Be First to Comment