Press "Enter" to skip to content

साखरेचे पदार्थ हे आधुनिक युगातील तंबाखू

कोरोनाची लाट ओसरल्यावर हृदयविकार रुग्णांमध्ये होत आहे वाढ

सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆

गभरात जागतिक हृदय दिन साजरा होत असताना भारतात वाढत्या हृदय रोगाचे प्रमाण हे निश्चितच धोक्याची सुचना आहे. जर योग्य काळजी घेतली तर आपण हृदयरोगास निश्चितच टाळू शकतो. भारतात हृदयविकाराचे प्रमाण बघितले तर प्रत्येक ३३ सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु पावतो. एकूणच जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आहेत. आणखी एक बाब म्हणजे भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दुसरं म्हणजे वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पूरक ठरत आहेत. आत यात भर पडली आहे ती कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांना हृदयविकाराची लागण होत आहे,

याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथिल अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट ( हृदयविकारतज्ञ ) डॉ. हेमंत खेमानी म्हणाले, ” कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचं आढळून आलंय. भारतात कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे.कोरोना उपचारानंतर बऱ्याच जणांना आपला तोल जात असल्याचा जाणवतं. अनेकांना थोडं चाललं किंवा जीना चढताना-उतरताना दम लागत असल्यास जाणवायला लागतं. अवसान गेल्यासारखे वाटतं. बऱ्याच जणांना हृदयाचे ठोके वाढत असल्याचं जाणवतं. साधारणपणे आपल्या हृदयाचे मिनिटाला ७२ ठोके पडतात. मात्र, अशा रुग्णांच्या हृदयाचे ठोके १०० ते ११० पर्यंत वाढल्याचं दिसतं. काही घटनांमध्ये, तर हृदयाचे ठोके १२० पर्यंत वाढलेले दिसतात. त्याचबरोबर कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं आढळून येत आहे. डायबेटीसग्रस्त रुग्णांना याचा अधिक धोका असल्याने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना काळातल्या उपचारानंतर अनेक घटनांमध्ये महिना-दीड महिन्यानंतर रक्त घट्ट होऊन गुठळ्या झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे ब्लॉकेज चे प्रमाण वाढू शकते.आपल्याला कोव्हिडसमवेत किमान दहा वर्षे आपल्याला दक्षता घेणे गरजेचे आहे. कोव्हिडला पराभूत करण्यासाठी शरीरातल्या बदलांवर लक्षपूर्वक नजर ठेवणे, वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं, आवश्यक औषधोपचार सुरू करणं या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल.”

आहार व हृदयविकार याची सांगड समजावून सांगताना कार्डिओ थोरॅसिक आणि रक्तवाहिन्यासंबंधी शल्यचिकित्सक व प्लॅटिनम हॉस्पिटलचे संचालक डॉ. बिजॉय कुट्टी सांगतात,”आहार, जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हृदयरोगात त्याचे महत्त्व तर अनन्यसाधारणच आहे. पण हृदयरोगाचे निदान झाले किंवा हृदयरोग टाळायचा असेल तर आपल्याकडे आहार अचानक बदलणे शक्य नसते. कारण आपला आहार हा त्या राज्याची संस्कृती, परिसर, सभौतालच्या वातावरण व लोकांवर अवलंबून असतो. मात्र, व्यायामाशी निगडीत काही ठोकताळे अथवा सर्वसाधारण नियम पाळले तरी आहारावर नियंत्रण आणणे कठीण काम असते . त्यापैकी पहिली बाब म्हणजे साखर किंवा साखर जन्य पदार्थांचे सेवन कमी किंबहुना वर्ज्य करणे. हल्ली तर रोजच्या जेवणानंतर डेजर्ट म्हणून गोड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे अयोग्य असून लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टंस, मधूमेह आणि पर्यायाने हृदयविकारास आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे साखर हा नव्या युगाचा तंबाखूच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १० वर्षांपूर्वी साखरेचे अथवा गोड पदार्थ काही ठरविक सणाला अथवा कार्यक्रमाला घरीआणले जात परंतु आता ३६५ दिवस आपण केक, बिस्किटे, मिठाई, गुलबजाम व इतर पदार्थ खात असतो. प्रिजर्व्ह अथवा डबाबंद पदार्थ हृदयासाठी घातकच आहे. त्या बाबी डबाबंद असल्यामुळे ताजे तर मुळीच नसतील. शिवाय टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा वापर देखील केल्या गेला असेल. हे रसायनं हृदयासाठी घातक ठरू शकतात. मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना कमी वयातच हृदयविकार होण्याची शक्यता असते. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये हृदय फेल्युअरची प्रकरणे (क्रॉनिक हार्ट फेल २५% आणि अक्युट हार्ट फेल ४०%) अधिक सामान्य आहेत. ही समस्या सामान्य लोकांच्या तुलनेत मधुमेही रुग्णांमध्ये चौपट जास्त असते. “

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.