सिटी बेल ∆ केळवणे ∆ अजय शिवकर ∆
पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे गाव केळवणे येथे पंचक्रोशीतील एकमेव असे जागृत पुरातन भवानी मातेचे मंदिर आहे ,ही देवी अडचणीत असलेल्या भक्तांच्या हाकेला धावते आणि काहीही मागणाऱ्याच्या नवसाला पावते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे, म्हणूनच तिला “हाकेला धावणारी नवसाला पावणारी गावदेवी भवानी माता म्हणतात .
देवी जवळ जे मागलेले मिळाल्यावर तो नवस फेडणारे नवरात्रीचे नऊ दिवस-रात्र मंदिरातच डेरा घालून राहतात व दसरा झाल्यावर होम-हवन झाल्यावर तृप्त मनाने दहाव्या दिवशी घरी परततो.

या देवीच्या चमत्काराची प्रचिती असंख्य लोकांना आली आहे, म्हणूनचही देवी सर्वांचे श्रद्धास्थान आहे, दूरदूरचे लोक केळवणे येथे लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात.
दरवर्षी प्रमाणे केळवणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांनी शुक्रवार ३० सप्टेंबर ला गावदेवी मंदिरात कलात्मक कार्यक्रम साजरा केला. यात प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांनी गाण्यांवर नृत्य करून सर्वांचे मोठ्या उत्साहाने मनोरंजन कले. परंतु तिसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी कु. अनुज शिवकर याच्या सर्वात लक्षवेधी देवीच्या व्याख्यानाने सर्वांचे लक्ष केन्द्रीत केले.
या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रविण वसंत पाटील ,शिक्षिका प्रतिज्ञा म्हात्रे ,शिक्षक दिनकर पाटील , शिक्षिका करूणा मोकल .आणि शिक्षक निवेदक किरण पाटील यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांत उत्साह जागृत केला.








Be First to Comment