सिटी बेल ∆ उरण ∆ सुनिल ठाकूर ∆
रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय ,महालण विभाग फुंडे, लिओ क्लब ऑफ उरण आणि अरदीता करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन परिसंवाद संपन्न झाले.सदरचे परिसंवाद पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून श्री. भूषण कट्टीमनी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबल, एम.पी.एस. सी. व इतर स्पर्धा परीक्षा तयारी कशी करायची याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.या परिसंवादाच्या आयोजनासाठी लिओ क्लब ऑफ उरण चे प्रेसिडेंट श्रेयस रुईकर व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.घोरपडे सर यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी.पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महाले सर यांचेही सहकार्य लाभले. सदरचे परिसंवाद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.तसेच प्रा.गोसावी सर, डॉ.ठक्कर सर ,प्रांजल भोईर सर, डॉ.सोनवले सर,प्रा.कांबळे सर व महाविद्यालयातील इतर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा.धिंदले सर यांनी केले.परिसंवादाचे नियोजन व आभार प्रा.देसाई सर यांनी केले.








Be First to Comment